सेमीकंडक्टर उद्योगासाठी पुणे महत्त्वाचे केंद्र

सेमीकंडक्टर उद्योगासाठी पुणे महत्त्वाचे केंद्र
Published on

पुणे, ता. २८ : ‘‘सेमीकंडक्टर उद्योग हा आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा आहे. त्या अनुषंगाने पुणे हे उद्योग, शिक्षणतज्ज्ञ आणि धोरणकर्ते यांच्या सहकार्याने सतत प्रगतिशील राहिले आहे. शहरातील कुशल मनुष्यबळ आणि जागतिक उद्योगांशी असलेली मजबूत नाळ ही या क्षेत्राच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे,’’ असे प्रतिपादन अमेरिकी दूतावासाचे प्रवक्ते ग्रेग पार्डो यांनी केले.
मुंबईतील अमेरिकी दूतावास, ‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’ (आयएसीसी) आणि ‘शार्दूल अमरचंद मंगलदास अॅण्ड कंपनी’ यांच्यातर्फे सेमीकंडक्टर उद्योगावर आधारित चर्चासत्रात ते बोलत होते. अमेरिका-भारत सेमीकंडक्टर क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यासाठी आयोजित चार भागांच्या मालिकेतील हे तिसरे चर्चासत्र होते.
जी-२० डिजिटल अर्थव्यवस्थेवरील चर्चा असो किंवा सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करणे असो, पुणे उच्च तंत्रज्ञानातील सहकार्याच्या आघाडीवर आहे, असेही पार्डो यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारीत जाहीर केलेल्या ‘ट्रस्ट’ (ट्रान्सफॉर्मींग द रिलेशनशिप युटिलायझींग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी) या उपक्रमांतर्गत हे चर्चासत्र झाले. शहरातील तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजकांनी एकत्र येऊन सेमीकंडक्टर उद्योगातील नव्या प्रवृत्ती, आव्हाने, संधी आणि धोरणात्मक शिफारशी अशा विषयांवर चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), उद्योगतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, गुंतवणूकदार आणि सेमीकंडक्टर उद्योगातील तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला.
या मालिकेतील पहिली बैठक १५ जानेवारी रोजी मुंबईत आणि दुसरी बैठक २८ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे झाली. महाराष्ट्र सरकार आणि उद्योग क्षेत्राकडून या चर्चासत्रांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुण्यातील तिसऱ्या चर्चासत्राने सरकार, शिक्षणसंस्था आणि खासगी क्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला. सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्रातील भारताचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी आवश्यक धोरणे आणि पायाभूत सुविधा विकसित करण्याची गरज असल्याचे यामध्ये अधोरेखित करण्यात आले.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com