दौंडमध्ये सापडलेले अर्भक पाच वर्षांपूर्वीचे

दौंडमध्ये सापडलेले अर्भक पाच वर्षांपूर्वीचे
Published on

पुणे, ता. २८ : दौंडमध्ये बरणीत आढळलेले पुरुष अर्भक हे पाच वर्षांपूर्वीचे असून, एका गर्भवतीने त्‍याला ते केवळ १८ ते २० आठवड्यांचे असताना खासगी रुग्‍णालयात जन्‍म दिला होता. रुग्‍णालयाने ते अर्भक फॉर्मलिन या द्रावणात जतन करून ठेवले होते. रुग्‍णालयाच्‍या परिचारिका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्‍यासाठी त्‍याचा उपयोग करण्‍यात येत होता, अशी धक्कादायक माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सकांनी आरोग्‍य विभागाला सादर केलेल्‍या अहवालातून समोर आली आहे. या प्रकरणी आरोग्‍य शरीरशास्त्र व जैववैद्यकीय कायद्याचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.
२५ मार्चला दौंडमध्ये कचऱ्यात काही बरण्या आढळून आल्या होत्या. यातील एका बरणीमध्ये मृत अर्भक, तर इतर बरण्यांमध्ये मानवी अवशेष आढळून आले होते. या घटनेमुळे दौंडमध्ये खळबळ उडाली होती. दौंड पोलिसांनी अर्भक असलेल्या बरण्या ताब्यात घेत अज्ञातावर गुन्‍हा दाखल केला. याबाबत जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. नागनाथ यमपल्‍ले यांनी घटनास्‍थळी जाऊन त्‍याबाबतची पाहणी करून तो अहवाल पुणे परिमंडळाचे आरोग्‍य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांना सादर केला आहे.
अहवालानुसार एका बरणीमध्‍ये हे अर्भक होते, तर इतर दहा बरण्‍यांमध्‍ये स्‍तन, वृषण, गर्भाशय, पाणथरी, अंडाशयाची गाठ असे विविध प्रकारचे अवयव आढळून आले हेाते. याबाबत आरोग्‍य विभागाने गोपाळवाडी येथील एका रुग्‍णालयाला भेट देत चौकशी केली. त्‍यावेळी तेथील डॉक्‍टरांनी सांगितले की बरण्यांमधील अवयव हे शस्त्रक्रियेदरम्‍यान काढलेले असून, बरण्‍यांमध्‍ये जतन करून ठेवलेले होते. ३० ऑगस्‍टला एक गर्भवती पोटदुखीच्‍या त्रासासाठी रुग्‍णालयात आली असता तिने १८ ते २० आठवड्यांच्या अर्भकाला जन्‍म दिला. तसेच त्‍यांनी ते अर्भक व अवयव जतन करण्‍याची परवानगीदेखील घेतलेली नसून, त्‍याचा उपयोग शैक्षणिक साहित्‍य म्‍हणून केला आहे.

रुग्‍णालयाला कारणे दाखवा नोटीस
या प्रकरणात गर्भलिंगनिदान कायद्याचे उल्‍लंघन झालेले दिसून येत नाही. विनापरवानगी मानवी अवयव जतन केल्‍याने ‘ॲनॉटॉमी ॲक्‍ट १९४९’ या कायद्याचा भंग झाला आहे, तर त्‍याची विल्‍हेवाट अयोग्‍य पद्धतीने केल्‍याने जैववैद्यकीय कचरा कायद्याचे उल्‍लंघन झाले आहे. याबाबत पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून दौंड उपजिल्‍हा रुग्‍णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित रुग्‍णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती पुणे परिमंडळाचे आरोग्‍य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com