

पुणे, ता. ३० ः पारंपरिक पद्धतीने गुढ्या उभारण्यापासून शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष पूजाविधी, विविध वस्तूंची खरेदी यामुळे रविवारी शहरात चैतन्यमय वातावरण झाले होते. गुढीपाडवा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच संपूर्ण शहरात आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण होते.
रविवारी सकाळीच नागरिकांनी गुढ्या उभारल्या होत्या. केशरी, पिवळ्या रंगाची झेंडूची फुले, विविध फुलांच्या माळा आणि कडुलिंबाच्या पानांनी सुसज्ज गुढ्या शहराच्या प्रत्येक भागांत झळकत होत्या. गुढीपाडव्याचे मुख्य आकर्षण असलेल्या शोभायात्रांना नागरिकांनी भरघोस प्रतिसाद मिळाला. काही सामाजित संघटना, विविध गणेश मंडळे आणि सांस्कृतिक संघटनांनी भव्य शोभायात्रांचे आयोजन केले होते. शहरभरात विविध ठिकाणी पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही मंदिरांमध्ये विशेष पूजाविधी झाले, तर अनेक ठिकाणी कथाकथन, संगीत मैफिली, नृत्य सादरीकरण आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
गोड बेत आणि पारंपरिक जेवण
गुढीपाडवा म्हटले की कडुलिंबाच्या पानांची चव आणि गोड पदार्थांचा बेत ठरलेलाच. अनेक घरांमध्ये पुरणपोळी, श्रीखंड पुरी, मसाले भात यांसारखे पदार्थ बनविण्यात आले होते. तसेच, काही हॉटेलांमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास थाळी तयार केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.