

पुणे, ता. ३० : कुठे डॉक्टर, तर कुठे वकील, कुठे शासकीय अधिकारी, तर कुठे महिला पोलिस अन् यांच्या सोबतीला पारंपरिक वेश परिधान करून मोठ्या संख्येने आलेल्या तनिष्का सदस्या. हे चित्र होते ‘तनिष्का व्यासपीठा’च्या १२ व्या वर्धापन दिनाचे.
राज्यभरात ‘भक्ती-शक्ती आणि एकात्मते’च्या गुढ्या ठिकठिकाणी उभारून ‘तनिष्का व्यासपीठा’चा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या गुढीपाडव्याला ‘तनिष्का’ने १३ व्या वर्षात पदार्पण केले. आपली संस्कृती, परंपरा पुन्हा एकदा रुजावी आणि समाजातील सलोखा वाढीस लागून सकारात्मक बदल घडविण्यासाठी यंदा ‘भक्ती-शक्ती आणि एकात्मते’ची गुढी उभारण्यात आली.
धायरीतील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या विद्येच्या प्रांगणात भक्तीची गुढी उभारली. तनिष्का गटप्रमुख सुनीता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी गुढी उभारली. नियोजन संस्थेचे अध्यक्ष काका चव्हाण, संचालक अनिकेत चव्हाण यांनी केले होते. बी. टी. कवडे रस्ता येथील क्लारा शाळेच्या मैदानावर शक्तीची गुढी उभारण्यात आली. या वेळी परिसरातील सर्व तनिष्का पारंपरिक वेशात पैठणी, नऊवारी नेसून फेटे बांधून उपस्थित होत्या. माजी नगरसेविका सुरेखा कवडे, डॉ. सुरेखा चव्हाण, छाया तावडे, वृषाली मोडक, सुरेखा कवडे, अलका शिंदे, जया कामठे आदी उपस्थित होत्या.
टिंबर मार्केटमधील आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत एकात्मतेची गुढी उभारण्यात आली. शाळेचे अध्यक्ष सुभाष परमार यांचे सहकार्य मिळाले. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभ भाई पटेल रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. उषा तपासे होत्या. मुख्याध्यापिका विमल परदेशी, स्नेहल खटावकर, पूर्व प्राथमिकच्या समन्वयक भाविका राठोड, पर्यवेक्षक कल्पेश दर्जी आदींनी संयोजन केले.
दत्तवाडीतील शंकर मंदिरात तनिष्का व्यासपीठ, शिवशक्ती कबड्डी संघ मित्र मंडळ, शिवशक्ती सेवा संस्था यांच्यातर्फे गुढी उभारण्यात आली. दामिनी पथकाच्या अधिकारी निवेदिता यादव, सुप्रिया मुदगुन उपस्थित होत्या. तनिष्का सदस्यांनी महिला सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाचे संवर्धन याबाबत समाजासाठी भरीव योगदान देण्याचा संकल्प केला. जिल्हा समन्वयक मंदार चक्रदेव, विभाग समन्वयक जागृती कुलकर्णी, प्रयागा होगे, मोहिनी मोहिते यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.