रेडीरेकनरचे नवे दर उद्या जाहीर होणार

रेडीरेकनरचे नवे दर
उद्या जाहीर होणार
Published on

पुणे, ता. ३० ः राज्यात नोंदणी व मुद्रांक विभाग दरवर्षी एक एप्रिलला जमिनी, सदनिका, दुकाने आदींचे रेडीरेकनरमधील (बाजारमूल्य दर तक्ते) नवे दर लागू केले करतो. त्यानुसार हे दर वाढणार का, याची बाजारपेठेत चर्चा आहे.
गेल्या दोन वर्षांत रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पुढील आर्थिक वर्षात (२०५-२६) किती टक्के वाढ होणार याकडे बाजारपेठेचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात सरासरी सात ते दहा टक्के वाढ होण्याची चर्चा आहे.
रेडीरेकनरच्या निश्चित झालेल्या दरानुसार खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. या दरानुसार व्यवहाराच्या रकमेवर नागरिकांना मुद्रांक शुल्क भरावे लागते. नोंदणी व मुद्रांक विभागाने तयार केलेले जमीन, सदनिकांचे दर इतर विभागही ग्राह्य धरतात. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असते.
यंदा पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहराच्या रेडीरेकनरच्या दरात सरासरी दहा ते पंधरा टक्के प्रस्तावित करण्यात आली आहे. नगरपालिका हद्दीत १२ टक्के आणि ग्रामीण भागात सरासरी १० टक्के वाढीची शिफारस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही महापालिका, तसेच नगरपालिका हद्दीलगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. अशा शहरालगतच्या गावांचा समावेश प्रभाव क्षेत्रात करण्यात आला असून तिथे साडेदहा टक्के इतकी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यावर राज्य सरकारकडून अंतिम मान्यता मिळाल्यास एक एप्रिलपासून दरवाढ लागू होईल.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com