जागतिक नकाशावर 
पुणे जिल्हा झळकणार
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा विश्‍वास

जागतिक नकाशावर पुणे जिल्हा झळकणार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा विश्‍वास

Published on

पुणे, ता. २९ : वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नागरिकांना सायकलचा वापर करण्याबाबत प्रोत्साहित करणे, निरोगी जीवनशैलीकडे समाजाला प्रवृत्त करणे आणि विदेशी पर्यटकांना पुण्याची ओळख करून देऊन, पर्यटन क्षेत्राचा विकास साधणे या उद्देशांनी पुणे ग्रँड चॅलेंज टूर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्हा जागतिक नकाशावर ठळकपणे झळकणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे बोधचिन्ह, टी शर्टचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर आशियायी सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष तथा यूसीआयचे उपाध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, पीजीटीचे तांत्रिक संचालक पीनासी बायसेक आणि जिल्हाधिकारी डुडी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २१० आंतरराष्ट्रीय सायकल फेडरेशनना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. आतापर्यंत २५ देशांतील पथकांनी सहभागाची तयारी दर्शविली आहे. युसीआय २.२ या निकषानुसार अधिकाधिक २४ पथके या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक पथकात चार खेळाडू असल्यामुळे एकूण १७६ खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी २८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध विभागांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या असून, बजाज ऑटो, सिरम इन्स्टिट्यूट, चितळे ग्रुप आणि पंचशील ग्रुप यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com