मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्या 
तृतीयपंथीयासह तिघांना अटक

मेफेड्रॉनची विक्री करणाऱ्या तृतीयपंथीयासह तिघांना अटक

Published on

पुणे, ता. २९ : अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागाने हडपसर परिसरात धाड टाकून मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या तृतीयपंथीयासह तिघांना अटक केली आहे. या कारवाईत चार लाख ३१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
टास्क फोर्सचे अधिकारी मंगळवारी हडपसर, वानवडी आणि काळेपडळ भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना मांजरी ते १५ नंबर चौक रोडवरील इंडेन गॅस एजन्सीजवळील परिसरात एका दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरणारी महिला आणि तृतीयपंथी दिसून आले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातून ६० ग्रॅम ८ मिली वजनाचा मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ, दोन मोबाईल फोन, वजन काटा आणि दुचाकी असा चार लाख ३१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये मेघा दीपक जगताप (वय २७, रा. महादेवनगर, हडपसर) आणि तृतीयपंथी स्नेहल ऊर्फ गणेश शिवसांच (वय २१, रा. ससाणेनगर रोड, हडपसर) यांचा समावेश आहे. चौकशीत मेघा हिने हा अमली पदार्थ सलमान सलीम शेख (रा. घोरपडे पेठ) याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.
या तिन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील (अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोल्हापूर कृती विभाग पुणे) या तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक उमेश तावसकर, प्रेमा पाटील, सरोजनी चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक माधवानंद धोत्रे आणि पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com