मुकुंद आगीवाल देशात पहिला
‘सीए’चा निकाल जाहीर ः तेजस मुंदडा द्वितीय

मुकुंद आगीवाल देशात पहिला ‘सीए’चा निकाल जाहीर ः तेजस मुंदडा द्वितीय

Published on

पुणे, ता. ३ : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे सनदी लेखापाल (सीए) अंतिम, इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. संपूर्ण देशातून मध्य प्रदेशमधील धामनोद येथील मुकुंद आगीवाल याने सनदी लेखापाल अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हैदराबादमधील तेजस मुंदडा याने द्वितीय आणि राजस्थानातील अलवर येथील बकुल गुप्ता याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
‘आयसीएआय’ यांच्यातर्फे सीए अंतिम, इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात आली. या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील ८१ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी ‘आयसीएआय’च्या वतीने सप्टेंबरमध्ये झालेल्या अंतिम परीक्षेला नोंदणी केली. या परीक्षेत मुकुंद याने ८३.३३ टक्के, तेजस याने ८२ टक्के आणि बकुल याने ८१.५० टक्के गुण मिळविले आहेत. देशातील ४५८ केंद्रांवर ही परीक्षा झाली.
देशातील एक लाख ५९ हजार ७७९ विद्यार्थ्यांनी सीए इंटरमिजिएट परीक्षेसाठी नोंदणी केली. तर, एक लाख १२ हजार २८७ विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन परीक्षेसाठी नोंदणी केली. ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए चरणजोत सिंग नंदा म्हणाले, ‘‘तुमचे यश हे तुमच्या मेहनतीचे, निर्धाराचे आणि अखंड समर्पणाचे फळ आहे. हे यश तुमच्या पालक आणि मार्गदर्शक यांच्या सततच्या पाठिंब्याचे, प्रोत्साहनाचे आणि त्यागाचेही प्रतिबिंब आहे. तुमचे ज्ञान, प्रामाणिकता आणि मूल्ये ‘विकसित भारत’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.’’

...............
अंतिम परीक्षेच्या निकालाची आकडेवारी
ग्रुप : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी
ग्रुप एक : ५१,९५५ : १२,८११ : २४.६६ टक्के
ग्रुप दोन : ३२,२७३ : ८,१५१ : २५.२६ टक्के
ग्रुप एक आणि दोन : १६,८०० : २,७२७ : १६.२३ टक्के
...........
*सीए इंटमिजिएट परीक्षेचा निकाल :*
ग्रुप : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी
ग्रुप एक : ९३,०७४ : ८,७८० : ९.४३ टक्के
ग्रुप दोन : ६९,७६८ : १८,९३८ : २७.१४ टक्के
ग्रुप एक आणि दोन : ३६,३९८ : ३,६६३ : १०.०६ टक्के
...........
*सीए फाउंडेशनच्या निकालाची आकडेवारी :*
तपशील : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण झालेले
विद्यार्थी : ५१,१२० : ८,०४६
विद्यार्थिनी : ४७,७०७ : ६,५६३
एकूण : ९८,८२७ : १४,६०९
..................

अध्यात्म आणि शिक्षणाची सांगड
----------------------------
आंदगाव (आटाळवाडी) (ता. मुळशी) येथील कुणाल आटाळे याने सीए अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. शेतकरी कुटुंबातील कुणाल याचे वडील शेती आणि घोटावडे फाटा येथे नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. कुणाल म्हणाला,‘‘आमच्या गावात एक वरिष्ठ सीए आहेत. गावातील अनेकांवर त्यांचा प्रभाव आहे. ते सीए आहेत, म्हणून आई-वडिलांना मी देखील सीए व्हावे, असे वाटत होते. आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आमच्या गावातील मी तिसरा सीए आहे.’’ कुणाल हा स्वत: प्रवचन देखील करतो. अध्यात्म आणि शिक्षण या दोन्हीची उत्तम सांगड घालत, कुणाल सीए परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे.
फोटो ः 64928

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com