कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा महोत्सव

कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा महोत्सव

Published on

पुणे, ता. १७ : पुणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात ५१व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांना सोमवारी (ता. १७) जल्लोषात प्रारंभ झाला. यंदाच्या स्पर्धांचे यजमानपद पुणे ग्रामीण पोलिस दलाला मिळाले आहे.
पोलिस उपमुख्यालय, बऱ्हाणपूर (बारामती) येथे पोलिस परेड मैदानावर १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्‍घाटनासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह अन्य अधिकारी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आरोग्य, शिस्त व क्रीडावृत्तीचे महत्त्व स्पष्ट केले. ‘‘प्रत्येकाने स्वतःची शारीरिक तंदुरुस्ती राखणे अत्यावश्यक आहे. नियमांचे पालन करत स्पर्धा खेळाव्यात,’’ असे त्यांनी आवाहन केले. उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड म्हणाले, ‘‘कोल्हापूर परिक्षेत्राने सलग ११ वेळा राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे, ही अभिमानाची बाब आहे.’’
या क्रीडा महोत्सवात सात सांघिक आणि १२ वैयक्तिक अशा १९ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर या सहा घटकांतील ९०० पुरुष व २५० महिला खेळाडू सहभागी झाले आहेत.

या सर्वांनी सुवर्णपदक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. (पहिल्या दिवशीचे प्रमुख विजेते) :
- १० हजार मीटर धावणे (पुरुष) : हर्षवर्धन दबडे (सातारा)
- ५ हजार मीटर धावणे (महिला) : ऋतुजा कांबळे (पुणे ग्रामीण)
- ८०० मीटर धावणे (पुरुष) : ओंकार कुंभार (कोल्हापूर)
- लांबउडी (महिला) : आरती फाळके (सातारा)
- लांबउडी (पुरुष) : निहाल मोरे (सातारा)
- ११० मीटर हर्डल्स (पुरुष) : अमृत तिवळे (कोल्हापूर)
- १०० मीटर हर्डल्स (महिला) : वैष्णवी शिंदे (सातारा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com