लेखकांनी दबावाला बळी 
पडू नये ः विश्वास पाटील
‘अक्षरधारा’च्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन

लेखकांनी दबावाला बळी पडू नये ः विश्वास पाटील ‘अक्षरधारा’च्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन

Published on

पुणे, ता. १२ ः ‘‘सृजनशीलता आणि अभिव्यक्तीवर कोणत्याही बाह्य दडपणाचा परिणाम होऊ न देता लेखकाने स्वतःच्या आणि लोकांच्या मनातील विचार मुक्तपणे मांडले पाहिजेत,’’ असे मत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित ‘अभिजात मराठी शब्दोत्सव’ या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. याप्रसंगी राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिका राठीवडेकर, ‘अक्षरधारा’ दिवाळी अंकाच्या संपादक स्नेहा अवसरीकर आदी उपस्थित होते. लेखक व पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी पाटील यांच्याशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, ‘‘मजरूह सुलतानपुरी यांनी १९५० मध्ये पंडित नेहरूंवर टीका करणारी कविता लिहिली होती. नेहरूंची जाहीर माफी मागून, मजरूह सुलतानपुरी त्यांना होणाऱ्या संभाव्य त्रासापासून वाचू शकणार होते. मात्र, त्यांनी कोणतीही तडजोड न करता, ‘मी माझ्या शब्दांशी प्रामाणिक राहील’, अशी भूमिका घेत दीड वर्षे सक्तमजुरीची शिक्षा भोगली. लेखकाने कथा-कादंबरीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी लेखनासह पुनर्लेखनावर देखील भर देणे, आवश्यक आहे. स्तुतीपाठक मित्र असण्यापेक्षा वेळप्रसंगी कान पकडणारे आणि तुमच्याकडून अधिक अपेक्षा करणारे वाचक आणि प्रकाशक तुमच्या आजूबाजूला असणे आवश्यक असते.’’
पाटील यांनी ‘पानिपत’, ‘महानायक’, ‘लस्ट फॉर लालबाग’ अशा विविध कादंबऱ्यांची निर्मिती कथा उलगडली. शिरीष सहस्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केले. मुग्धा मिरजकर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ः 59546

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com