आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे पारितोषिक वितरण
पुणे, ता. १६ : नुकत्याच झालेल्या दृष्टिहीन विद्यार्थी आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व, प्रश्न मंजूषा व गीत गायन स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कर्वे रस्त्यावरील कोहिनूर मंगल सभागृहात पार पडले.
या वेळी गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे अध्यक्ष मधुकर देशपांडे, उपाध्यक्ष गणेश कुलकर्णी, सचिव श्रीकांत कुलकर्णी, खजिनदार सतीश टंकसाळे, डॉ. आश्विन देशपांडे, जयंत पेशवे, सतीश ब्रह्मे, विवेकानंद कुलकर्णी, प्रकाश जगताप, प्रा. योगिता काळे, राहुल शहा आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेने दिव्यझेप, स. प. महाविद्यालय व मॉडर्न महाविद्यालय यांच्या सहकार्यातून या स्पर्धा घेतल्या.
या वेळी देशपांडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहचविण्याचे शिवधनुष्य संस्थेच्या स्वयंसेवकांनी पेलले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप, गरजूंना शैक्षणिक फी माफ, महिलांना आर्थिक मदत, कर्णबधिर मुलांना श्रवण यंत्रे असे विविध प्रकल्प संस्थेमार्फत चालविले जात आहेत.’’
श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन सतीश टंकसाळे यांनी, तर विवेकानंद कुलकर्णी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

