‘ऑफलाइन हॅकेथॉन’मध्ये ‘रायसोनी’ला उपविजेतेपद
पुणे, ता. १६ : ‘जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट’च्या विद्यार्थी संघ फिनोव्हेटर्सने चेन्नई येथील अण्णा विद्यापीठ येथे झालेल्या ‘टेमेनोसने’ आयोजित ‘टेम-ए-थॉन’ ऑफलाइन हॅकेथॉनमध्ये उपविजेतेपद पटकावले.
या संघात बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) संगणक अभियांत्रिकीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) विभागाचे विद्यार्थी लक्ष्य माकोडे, ‘एआय एमएल’ विभागाच्या द्वित्तीय वर्षाचा विद्यार्थी स्वप्नील पाटील आणि सुमीत गोंड यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे ‘अॅपल आयपॅड एअर २’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित दृष्टिकोन वापरून टीम फिनोव्हेटर्सने बँकिंग प्रणालींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे व्यावहारिक आणि जबाबदार प्रयोग विकसित केले. त्यांनी समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि नावीन्यपूर्ण मानसिकतेचे प्रदर्शन या वेळी केले. रायसोनी कॉलेज पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले, ‘‘ही कामगिरी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्णता आणि नैतिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी प्रेरणादायी आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

