पत्रकारांसाठी ‘हेल्थ कार्ड’चे अनावरण

पत्रकारांसाठी ‘हेल्थ कार्ड’चे अनावरण

Published on

पुणे, ता. १६ : ‘‘समाजात घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन पत्रकार रात्रंदिवस करतात, मात्र त्याचदरम्यान त्‍यांचे स्‍वतःच्‍या आरोग्‍याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना योग्य वेळेत तपासण्या करण्यासाठी ‘हेल्थ कार्ड’चा फायदा होईल. तसेच पत्रकार व कुटुंबीयांना सवलतीच्‍या दरात सुविधा मिळाव्‍यात, यासाठी गरज पडल्‍यास पुण्‍यातील खासगी रुग्‍णालयांबरोबरही चर्चा करू,’’ असे आश्‍वासन केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी दिले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्यातर्फे पत्रकारांसाठीच्या ‘हेल्थ कार्ड’चे अनावरण मोहोळ यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. क्रस्ना डायग्नोस्टिक्सचे अध्यक्ष राजेंद्र मुथा, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव उपस्थित होत्या. अल्प दरातील सुविधांचा फायदा आम्ही पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना करून देऊ, असा विश्वास क्रस्ना डायग्नोस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक यश मुथा यांनी व्यक्त केला. पत्रकार संघाचे अध्यक्ष भावे यांनी आरोग्य सुविधा योजनांचा आढावा घेतला. मीनाक्षी गुरव यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी जाधव-केदारी यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर भोंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com