‘जीबीएस’चा रविवारी एकही नवा रुग्‍ण नाही

‘जीबीएस’चा रविवारी एकही नवा रुग्‍ण नाही

Published on

पुणे, ता. १६ : ‘जीबीएस’ रुग्‍णांची संख्या सातत्‍याने कमी होत असून, रविवारी (ता. १६) एकही नवीन रुग्‍ण आढळला नाही. आतापर्यंत २०८ रुग्‍ण आढळले असून, त्‍यापैकी १३१ रुग्‍णांवर उपचार झाल्‍याने त्‍यांना घरी सोडण्‍यात आले. दिवसेंदिवस नवीन रुग्‍णांची संख्‍या कमी होत असून, बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्‍या वाढत असल्‍याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.
‘जीबीएस’च्‍या रुग्‍णांची सर्वाधिक संख्‍या ही २० ते २९ वयोगटातील असून, ती ४४ इतकी आहे. ० ते ९ वयोगटातील मुलांची संख्‍या २४ व १० ते १९ वयोगटातील मुलांची संख्‍या २५ आहे. ३० ते ५९ वयोगटात ८४ रुग्‍ण आहेत. दरम्‍यान ६० ते ६९ वयोगटात २१ संख्‍या आहे. ७० ते ७९ दरम्‍यान ६ व ८० ते ८९ वयोगटात ४ रुग्‍ण आहेत. दरम्‍यान, अतिदक्षता विभागातील रुग्‍णांची संख्‍या कमी होत असली तरी व्‍हेंटिलेटरवरील रुग्‍णांची संख्‍या मात्र स्थिर आहे.

‘जीबीएस’ रुग्‍णसंख्‍या सद्यःस्थिती
नवे रुग्ण ः ०
एकूण रुग्‍ण ः २०८ (पुणे शहर-४२, समाविष्ट गावांतील रुग्‍ण-९४, पिंपरी-चिंचवड-३०, पुणे ग्रामीण-३२, इतर जिल्ह्यांतील-१०)
- अतिदक्षता विभागात ः ४२
- व्‍हेंटिलेटरवर ः २१
- बरे झालेले ः १३१
- मृत्‍यू ः ८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com