अतिसार, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले

अतिसार, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले

Published on

पुणे, ता. १८ : सध्‍या पुणे शहरात ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’चे (जीबीएस) रुग्‍ण आढळून येत आहेत. दूषित पाण्यामुळे हे रुग्‍ण वाढल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍याच पार्श्वभूमीवर दूषित अन्‍न व पाण्‍यामुळे होणाऱ्या अतिसार (डायरिया), गॅस्ट्रोच्या रुग्‍णांची संख्‍याही वाढलेली आहे. गेल्‍या महिन्‍यात पुण्यात अतिसाराचे ८५९ तर गॅस्ट्रोचे ६९ रुग्‍ण महापालिकेच्‍या दवाखान्‍यांत आढळून आलेले आहेत. त्‍यावरून दूषित पाण्‍याचे स्रोत शहरात असल्याचे सिद्ध होते.

अतिसार दूषित अन्नपदार्थांचे सेवन व पाण्यामुळे होणारा आजार आहे. यामध्‍ये रुग्‍णाला वारंवार जुलाब होतात. त्‍याचबरोबर पोटात ढवळले जाणे, उलट्या होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. त्‍यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रुग्‍णाला अशक्तपणाही येतो. गॅस्ट्रोमध्‍येही अतिसाराची लक्षणे असतात व त्‍यामध्‍ये रुग्‍णाला ताप येतो. मुलांमध्ये ‘रोटाव्हायरस’ तर, प्रौढांमध्ये ‘नोरोव्हायरस’ हे या आजाराचे कारण असून दूषित पाण्यामुळे या आजाराचा प्रसार होतो.

ग्रामीण भागात विहिरीतील दूषित पाणी पिणे, उघड्यावरील अन्न पदार्थाचे सेवन, पाणी न गाळता, न उकळता पिणे आदी कारणांमुळे गॅस्ट्रोचा प्रसार होतो. यावर त्‍वरित उपचार घ्यायला हवेत. अन्‍यथा अशक्‍तपणा वाढून जिवालाही धोका होऊ शकतो.

वर्षभरात अतिसाराचे नऊ हजार रुग्‍ण
पुणे शहरात प्रत्‍येक महिन्‍यात अतिसाराचे ६०० ते ८०० दरम्‍यान रुग्‍ण आढळतात तर पावसाळ्यात त्‍यामध्‍ये आणखी वाढ होते. जून, जुलै, ऑगस्‍ट या कालावधीत ही संख्‍या हजारांवर जाते. गेल्‍यावर्षी शहरात अतिसाराचे नऊ हजार २०० तर गॅस्‍ट्रोचे १२०२ रुग्‍ण आढळले होते. खासगी रुग्‍णालयांतील रुग्‍णांची संख्‍या यामध्‍ये नाही.

अतिसाराची लक्षणे
- पोट दुखणे, वारंवार जुलाब, उलटी होणे, तोंड कोरडे पडणे
- लहान मुलांची टाळू व डोळे खोल जाणे
- लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे

काय आहेत उपाययोजना?
- पाणी गाळून व उकळून प्यावे
- स्‍वच्‍छ, ताजे व घरचे अन्‍न खा
- शौचाला जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा
- घरचा परिसर स्वच्छ ठेवा

अतिसार, गॅस्‍ट्रो हे आजार दूषित पाणी व अन्‍न यातूनच होतो. त्‍यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्‍यावे तसेच परिसरात स्‍वच्‍छता बाळगावी.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्‍यप्रमुख, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com