‘महावितरण’रकडून धानोरी, 
लोहगावसाठी स्वतंत्र शाखा

‘महावितरण’रकडून धानोरी, लोहगावसाठी स्वतंत्र शाखा

Published on

पुणे, ता. १९ : नगर रस्ता विभाग अंतर्गत येणाऱ्या धानोरी शाखा कार्यालयाचे ‘महावितरण’कडून विभाजन करून नवीन लोहगाव शाखा कार्यालय व नवीन १८ पदांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे आता धानोरी, लोहगावसाठी स्वतंत्र शाखा कार्यालय सुरू झाले असून, या दोन्ही कार्यालयांमुळे सुमारे ६९ हजार वीज ग्राहकांना सुरळीत वीजसेवा मिळणार आहे.
नगर रस्ता विभागाच्या विश्रांतवाडी उपविभागातील धानोरी, लोहगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी धानोरी शाखा कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव ‘महावितरण’ मुख्यालयास सादर केला होता. त्यास मुख्यालयाने मान्यता दिली. त्याप्रमाणे धानोरी शाखा कार्यालयाचे विभाजन केले. यात २८ हजार ७०० वीजग्राहकांसाठी नवीन लोहगाव शाखा कार्यालयासह एक सहाय्यक अभियंता, एक कार्यालयीन सहाय्यक, दोन प्रधान तंत्रज्ञ, सहा वरिष्ठ तंत्रज्ञ आणि आठ तंत्रज्ञ अशी १८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
‘महावितरण’च्या जागेतच उभारलेल्या लोहगाव शाखा कार्यालयाचे मुख्य अभियंता पवार यांच्या हस्ते नुकतेच उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता अशोक जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सारंगधर केणेकर, सहाय्यक अभियंता राहुल बेंद्रे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com