कंत्राटी कामगारांच्या तक्रारी बेदखल

कंत्राटी कामगारांच्या तक्रारी बेदखल
Published on

पुणे, ता. १८ ः पुणे महापालिकेत हजारो कंत्राटी कामगार आहेत. त्यांचे आरोग्य, रजा, बोनस, भविष्य निर्वाह निधी यासह अनेक तक्रारी आहेत. अधिकारी आणि ठेकेदार याकडे लक्ष देत नसल्याने कामगारांचे शोषण होत आहे. महापालिका आयुक्तांकडे यासंदर्भात बैठक घेण्यासंदर्भात निवेदने दिलेली आहेत. तरीही अद्याप एकही बैठक झाली नाही. महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या तक्रारी बेदखल करण्यात आल्याचे चित्र सध्या आहे.
‘अधिकारी बेजबाबदार, कामगारांवर उपासमार’ या मथळ्याखाली महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या रेंगाळलेल्या निविदांमधील लालफितीचा कारभार ‘सकाळ’ने समोर आणला. प्रशासनाने वेळेत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे. पण त्याचे पालन होत नसल्याने कामगारांचे एक-दोन महिने वेतन होत नाही अशी अशी स्थिती आहे. कामगारांच्या प्रश्‍नाबाबत महापालिका गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रीय मजदूर संघाने केला आहे.
राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले, ‘‘पुणे महापालिका आयुक्तांना कंत्राटी कामगारांच्या संदर्भात अनेकदा निवेदन देऊन बैठक घेण्याची मागणी केलेली आहे. पण अजूनही बैठक घेतली नाही. कंत्राटी कामगारांना राष्ट्रीय सणांच्या सुट्टीच्या दिवशी कामाला बोलावले जाते, पण त्याचे वेतन दिले जात नाही व नंतर बदली सुट्टीही दिली जात नाही. कामगार उपयुक्त कार्यालयाने कामगारांना बोनस दिला पाहिजे असे आदेश दिले असले तरीही महापालिका त्या आदेशाचे पालन करत नाही. कंत्राटदारांची मुदत दर वर्षाला कधी संपते, हे अधिकाऱ्यांना व्यवस्थित माहिती असूनही, सहा महिने आधी नव्या निविदेची प्रक्रिया सुरू केली जात नसल्याने ठेकेदाराला मुदत वाढ दिली जाते. हे वारंवार का होते हा मोठा प्रश्‍न आहे. प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका ठेवल्यास याविरोधात महापालिकेपुढे कामगारांसह आंदोलन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com