

पुणे, ता. १८ ः जोयजलुक्कासने घडणावळ शुल्कावर ५० टक्के सूट देऊन ज्वेलरी खरेदीदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. जोयआलुक्कासच्या या खास महोत्सवात ग्राहकांना आमच्या शोरुममधील सर्व दागिन्यांसाठी घडणावळ शुल्कावर ५० टक्के सूट मिळेल. ‘सर्वांत मोठा दागिने सेल’ हा महोत्सव सर्व शोरूममध्ये नऊ मार्चपर्यंत सुरू आहे. या खास ऑफर व्यतिरिक्त, ग्राहकांना जोयआलुक्कासकडून प्रत्येक खरेदीवर मोफत आजीवन देखभाल, एक वर्षाचा मोफत विमा मिळतो.
या महोत्सवात सोने, पैलू पाडलेले आणि न पाडलेले हिरे, मौल्यवान खडे, प्लॅटिनम आणि चांदीचे दागिने यांचा समावेश असेल. जोगआलुक्कास दहा लाखांहून अधिक डिझाइन या निमित्ताने उपलब्ध करणार असून ज्यामध्ये पारंपरिक, समकालीन, इटालियन, तुर्की, एथनो-कंटेम्पररी आणि जगभरातील विस्तृत श्रेणीचा समावेश आहे. जगभरातील लाखो दागिने खरेदीदासाठी खास बनविलेल्या आवडत्या संग्रहाची श्रेणी पाहण्याची संधी दागिन्यांची आवड असणाऱ्यांना मिळणार आहे. जोगआलुक्कासमधील जागतिक दर्जाचे वातावरण, अत्यंत वैयक्तिक ग्राहक सेवा आणि प्रत्येक खरेदीदाराचा अनुभव आनंददायी बनवण्यासाठी सोईस्कर पार्किंग सुविधा आहेत. सेलबद्दल जोयआलुक्कासचे अध्यक्ष जोय आलुक्कास यांनी सांगितले की, ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी दागिन्यांचे सर्वोत्तम आणि विस्तृत पर्याय उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.