

पुणे, ता. १८ : अखिल भारतीय माहेश्वरी एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या शेठ श्री गंगाधर बन्सीलाल राठी माहेश्वरी हॉस्टेल, कोंढवा येथील विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यानिमित्ताने आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष राजेंद्र चांडक व भारती हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पथकाच्या उपस्थितीत झाले. चांडक यांनी समाजामधील रक्तदान जनजागृतीचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले, तसेच यापुढेही अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन दिले. ६२ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यानिमित्ताने १२२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी संस्थेचे व्यवस्थापक वल्लभदास बांगड, कार्यालयीन सहाय्यक, सफाई कर्मचारी तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.