‘वृद्धेश्वर-सिद्धेश्वर ट्रस्ट’तर्फे महाशिवरात्रीनिमित्त महोत्सव

‘वृद्धेश्वर-सिद्धेश्वर ट्रस्ट’तर्फे
महाशिवरात्रीनिमित्त महोत्सव
Published on

पुणे, ता. १८ : शिवाजीनगर गावठाण भांबुर्डा येथील श्री वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री उत्सवानिमित्त २१ ते २७ फेब्रुवारीदरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले असून, सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ट्रस्टचे सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्‍वस्त महेश दुर्गे, संजय सातपुते आदी उपस्थित होते.
शुक्रवारी (ता. २१) कीर्तनकार गणेशमहाराज भगत व सहकारी यांचा ‘अभंगवाणी’ हा कार्यक्रम होईल. शनिवारी (ता. २२) उद्धार प्रस्तुत ‘अर्पण’ कार्यक्रमात डॉ. आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्या यांचे कथक नृत्याचे सादरीकरण होईल. रविवारी (ता. २३) ‘रंग उषेचे’ हा गायिका उषा मंगेशकर यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कायर्क्रम. सोमवारी (ता. २४) गायक व संगीतकार पं. कल्याण गायकवाड, कौस्तुभ गायकवाड व गायिका कार्तिकी गायकवाड-पिसे ‘स्वरानुभूती’ कार्यक्रम सादर करतील. हे सर्व कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात दररोज सायंकाळी साडेसात वाजता सुरू होतील.
मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता मंदिरात शिव-पार्वती विवाह सोहळा व मिरवणूक आयोजित केली आहे. बुधवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजता श्री वृद्धेश्‍वर-सिद्धेश्‍वर जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रसंत प.पू. योगिराज भाऊमहाराज परांडे यांना धार्मिक क्षेत्रातील, माजी स्थायी समिती सदस्य बाळासाहेब बोडके यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारांचे वितरण संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार, कीर्तनकार राजाभाऊ रंधवे (चोपदार) यांच्या हस्ते होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com