पुण्याच्या मध्यवर्ती भागात आज वाहतुकीत बदल

पुण्याच्या मध्यवर्ती भागात आज वाहतुकीत बदल

Published on

पुणे, ता. १७ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, केळकर रस्त्यासह प्रमुख रस्त्यांवरून मिरवणुका निघणार आहेत. तसेच, केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन केले आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मंगळवारी (ता. १९) सकाळी सहा वाजल्यापासून मिरवणुका संपेपर्यंत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा
ही पदयात्रा ‘सीओईपी’ अभियांत्रिकी महाविद्यालय, स. गो. बर्वे चौक, ‘एसएसपीएमएस’ कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मॉडर्न चौक, झाशी राणी चौक, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय मैदान अशी जाणार आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत वाहतूक सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत बदल करण्यात येणार आहे.

वाहन पार्किंगबाबत
१) खडकी, येरवडा आरटीओ कार्यालयाकडून येणाऱ्या वाहनांसाठी संगमवाडी पार्किंग
२) कर्वे रस्ता, कोथरूडकडून येणाऱ्या वाहनांसाठी नदीपात्रातील पार्किंग
३) स्वारगेट, हडपसर, दांडेकर पुलाकडून येणाऱ्या वाहनांसाठी नदीपात्रातील पार्किंग
४) पाषाण, बाणेर रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी कृषी महाविद्यालय मैदान

हे लक्षात ठेवा
- मंगळवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीत बदल करण्यात येत आहे.
- जिजामाता चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, लोकमान्य टिळक रस्त्याने इच्छित स्थळी जातील
- स. गो. बर्वे चौकातून पुणे महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील
ः- गणेश रस्ता, दारूवाला पुलाकडून फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून इच्छितस्थळी जातील
- केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकमार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे
- पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौकातून लोकमान्य टिळक रस्त्याने अलका टॉकीज चौकातून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने इच्छित स्थळी जातील
- मिरवणुका सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे आणि बाजीराव रस्त्याने फुटका बुरुजाकडे न जाता सर्व वाहने केळकर रस्त्याने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील. तसेच सेवासदन चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे न जाता लक्ष्मी रस्तामार्गे इच्छित स्थळी जातील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com