शिवाजी महाराज विद्यानिकेतनचे स्नेहसंमेलन उत्साहात

शिवाजी महाराज विद्यानिकेतनचे स्नेहसंमेलन उत्साहात

Published on

पुणे, ता. १९ : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्र. १, शुक्रवार पेठ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन-पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन समारंभ गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे उत्साहात झाला.
प्रमुख पाहुणे महापालिका उपायुक्त आशा राऊत, सहप्रशासकीय अधिकारी डॉ. मनोरमा आवारे , शरद मेमाणे, सविता हराळ आणि नामदेव भजबळकर यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका वीणा नाईक यांनी प्रास्ताविक केले. पदवीधर शिक्षक जयवंत बोरसे यांनी स्वागत करून वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यानंतर विविध शालेय स्पर्धा परीक्षा, कला-क्रीडा स्पर्धा आणि उपक्रमांत विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच शाळेला मदत करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचाही सन्मान झाला. या वेळी आंतरराष्ट्रीय लेझीम मार्गदर्शक अर्जुन नरके, विठ्ठल भरेकर, विष्णू सुर्वे, नयना यादव, अविनाश रावलू, प्रकाश उघडे आणि नेहा वाळिंबे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com