‘पंतप्रधान आवास’साठी पावणेतीन हजार अर्ज दाखल
पुणे, ता. १९ ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यात तब्बल चार हजारांहून अधिक सदनिका बांधण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. या घरांसाठी आत्तापर्यंत सुमारे पावणेतीन हजारांहून अधिक अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान आवास योजने’च्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. पुणे महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात २ हजार ६५८ इतक्या सदनिका बांधल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची घोषणा करून नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेसाठी महापालिकेकडून अर्ज मागविण्यात आले होते. आत्तापर्यंत या योजनेसाठी २ हजार ७७७ इतके अर्ज दाखल झाल्याची माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
महत्त्वाचे
१) बालेवाडी (२९६), धानोरी (६७६), कोंढवा (७३६), हडपसर (२०००) व वडगाव खुर्द (४६५) येथील प्रस्तावित गृहप्रकल्पांत ४१७३ इतक्या सदनिका बांधणार
२) पुणे महापालिकेला ३०० कोटी रुपये इतका खर्च येणार
३) या योजनेतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार
४) आत्तापर्यंत २ हजार ७७७ इतके अर्ज दाखल
हे लक्षात ठेवा
- आर्थिक दुर्बल घटकांसाठी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न मर्यादा ६ लाखांपेक्षा जास्त नसावी
- इच्छुक लाभार्थ्यांनी युनिफाइड वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक
- केंद्र सरकारकडून दीड लाख, तर राज्य सरकारकडून दोन लाख रुपयांचे अनुदान
- ३० चौरस मीटर ते ४५ चौरस मीटरपर्यंतची घरे असणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

