‘स्वप्नशिल्प’च्या सचिवांवर 
बेकायदा वृक्षतोडीबद्दल खटला

‘स्वप्नशिल्प’च्या सचिवांवर बेकायदा वृक्षतोडीबद्दल खटला

Published on

पुणे, ता. १९ ः बेकायदा वृक्षतोड केल्याच्या आरोपावरून कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीच्या सचिवांविरुद्ध महापालिकेने न्यायालयात खटला दाखल केला आहे.
सोसायटीच्या उद्यानात गुलमोहोराचा २१ वर्षांपूर्वीचा वृक्ष होता. त्याच्यावर खाचा मारून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत प्रवाहामुळे वृक्ष गळून पडला. याबाबत सोसायटीमधील एका सदस्याने गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी रोजी महापालिकेत तक्रार केली. त्यानंतर उद्यान विभागाच्या निरीक्षकांनी पाहणी करून पंचनामा केला. तसेच सोसायटीच्या सचिवांकडे याबाबत तीन वेळा लेखी स्वरूपात विचारणा केली. परंतु, त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा आला नाही. त्यामुळे स्वप्नशिल्प सोसायटीचे सचिव अरविंद लेले यांच्याविरुद्ध वृक्ष अधिनियमांतर्गत नुकताच खटला दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com