रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

Published on

पुणे, ता. १९ : ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष... ढोल - ताशांचा गजर... विविध मर्दानी खेळ... हातांमध्ये फडकणारे भगवे झेंडे... अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात विविध राजकीय पक्ष, संघटना, शाळा, संस्थांतर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थी पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. रथासोबत नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल - ताशा आणि गंधर्व बँडचे वादन झाले. महिला सबलीकरण, पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत आदी संदेश विद्यार्थ्यांनी दिले. यावेळी इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे, सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, अण्णा थोरात, विकास गोगावले, जगदीश जेधे, कमल व्यवहारे उपस्थित होते.

समाजवादी पक्षातर्फे शिवाजीनगर येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर, अनिस अहमद, दत्ता पाकिरे, विनायक लांबे, अनिरुद्ध सूर्यवंशी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून ‘पुढंच पाऊल’ या मार्गदर्शिकेचे मुखपृष्ठ व शिवरायांची प्रतिमा भेट देऊन ९५ स्वराज्य रथांच्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष युवराज दिसले, राकेश गायकवाड, गणेश मापारी, श्रुतिका पाडळे, अनिकेत भगत यांनी केले. बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय घोलप यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सनी रायकर, उमेश तेजी, अरविंद बहुले, मच्छिंद्र सुपेकर, शंकर सुरवसे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या माजी शहराध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या हस्ते मार्केट यार्ड येथील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ज्योती गांधी, फिरोजा शेख, सारिका सोनवणे, राधिका नवले, मेधा श्रावगे उपस्थित होते.

कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानच्या संस्थापिका सुवर्णा भरेकर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रत्ना जगताप, विद्या भागवत, मीना गोसावी, रेवती हंबीर, प्रतिक्षा भरम उपस्थित होते. प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शशिकला कुंभार यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महेश कुंभार, वर्षाराणी कुंभार, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष महम्मद शेख, सुरेखा भालेराव, सतीश कांबळे, वंदना पवार, संतोष कदम उपस्थित होते. पर्वती मतदारसंघाचे भाजपचे उपाध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते मार्केट यार्ड येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नजीर शेख, गणेश शिवशरण, बसवराज कन्ने, राजेंद्र शहा, महेश साळुंखे उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रकाश दनाने, किशोर मुरमे, धनंजय हिरेमठ, व्यंकटेश दनाने, शुभम दनाने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com