पेस्ट कंट्रोल परवानाधारक
व्यावसायिकांची कार्यशाळा

पेस्ट कंट्रोल परवानाधारक व्यावसायिकांची कार्यशाळा

Published on

पेस्ट कंट्रोल परवानाधारक
व्यावसायिकांची कार्यशाळा
पुणे, ता.१९ ः ‘व्यावसायिकांनी ग्राहकांना पेस्ट कंट्रोल करण्यापूर्वी आणि पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन करावे, तसेच अॅल्युमिनियम फॉस्फाईड, एथिलीन ब्रोमाईड, मिथिल ब्रोमाईडसारख्या बंदी असलेल्या कीटकनाशकांचा वापर टाळावा,’ अशा सूचना व्यावसायिकांना कृषी विभागाकडून कार्यशाळेत करण्यात आल्या.

पुणे शहर आणि परिसरातील पेस्ट कंट्रोल परवानाधारक व्यावसायिकांचा प्रशिक्षण आणि आढावा जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या वेळी जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी धनंजय पाटील, हवेलीचे तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर, इंडियन पेस्ट मॅनेजमेंट असोसिएशनचे सारंग सावलेकर, गुरुप्रसाद आगवणे, हिरामण राठोड, विनोद चव्हाण, अरुण शर्मा आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘पेस्ट कंट्रोल परवानाधारक व्यावसायिकांनी बंदी असलेल्या अॅल्युमिनियम फॉस्फाईडसारख्या कीटकनाशकांचा वापर केल्यास संबंधितांवर कारवाई करून परवाने रद्द करण्यात येतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com