एरंडवण्यातील डीपी रस्त्यावर तरुणाला लुटणारे गजाआड

एरंडवण्यातील डीपी रस्त्यावर
तरुणाला लुटणारे गजाआड
Published on

पुणे, ता. १९ : धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणाला तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना अलंकार पोलिसांनी अटक केली. ही घटना गेल्या आठवड्यात एरंडवणे परिसरातील डीपी रस्त्यावर घडली होती.
सुमीत ऊर्फ अभिषेक ऊर्फ डायमंड राजू आसावरे (वय १९) आणि अभिषेक ऊर्फ कानोळ्या भारत खंदारे (वय २२, दोघे रा. किष्किंधानगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका तरुणाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. शनिवार पेठेत राहणारा तरुण गेल्या आठवड्यात म्हात्रे पुलाजवळील रस्त्यावर धावण्याचा सराव करत होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या आसावरे, खंदारे यांच्यासह तिघांनी त्याला तलवारीचा धाक दाखवत त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. या घटनेमुळे सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेची दखल घेत अलंकार पोलिसांनी डीपी रस्ता, कर्वेनगर व कोथरूड परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यानंतर तिघांपैकी दोघांना तत्काळ अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून तलवार, दुचाकी, दोन सोनसाखळ्या, पेंडेंट असा पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com