उंड्रीतील गोदामातून 
६४ लाखांचा गुटखा जप्त

उंड्रीतील गोदामातून ६४ लाखांचा गुटखा जप्त

Published on

पुणे, ता. १९ : गुटखा विक्रीवर बंदी असतानाही त्याची साठवणूक करून वितरण करणाऱ्या उंड्रीतील गोदामात काळेपडळ पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) छापा घातला. तेथून ६४ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करून गुटखा वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहनही जप्त केले आहे.
संपतराज पेमाराम चौहान (वय ३८, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. चौहानसह त्याच्या चार ते पाच साथीदारांविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ‘एफडीए’चे अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार उनवणे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, इतर पदार्थांची विक्री व जवळ बाळगण्यास बंदी घातली आहे. तरीही, बेकायदा गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या माहितीच्या आधारे आणि ‘एफडीए’च्या पथकाच्या मदतीने उंड्रीतील गोदामात छापा घातला. तेथून ६४ लाखांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी चौहानला अटक केली, तर त्याचे साथीदार फरारी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com