बाणेरमध्ये आजपासून भू-अर्थशास्त्र परिषद
पुणे, ता. १९ : केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या वतीने सहाव्या ‘आशिया इकॉनॉमिक डायलॉग’ या वार्षिक भू-अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ही परिषद गुरुवार (ता. २०) ते शनिवार (ता. २२) या कालावधीत बाणेरमधील पंचवटी परिसरातील पीआयसीच्या नवीन कॅम्पसमध्ये होणार आहे. या परिषदेची संकल्पना ‘विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान’ अशी आहे.
या परिषदेत १२ सत्रे होणार असून, त्यामध्ये नऊ देशांतील ४० वक्ते सहभागी होणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इंडोनेशिया, जपान, नेपाळ, नेदरलँड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या नऊ देशांतील धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगतज्ज्ञांचा समावेश असेल. उद्घाटन सत्रात परिषदेचे संयोजक आणि चीन, भूतान या देशांत भारताचे राजदूत म्हणून काम केलेले गौतम बंबावाले हे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ‘बायोकॉन समूहा’च्या अध्यक्ष किरण मुजुमदार-शॉ यांच्याशी लेखिका रमा बिजापूरकर संवाद साधणार आहेत. परिषदेच्या समारोप सत्रात केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव सहभागी होणार आहेत. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

