

पुणे, ता. १९ : शहरात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत आहे. आज कमाल तापमानाची ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंद झाली. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका जाणवत होता. पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे राहील आणि कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
शिरूर परिसरात सर्वाधिक ३८.७ तर कोरेगाव पार्क परिसरात ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरासह जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मार्च महिन्यात जाणवणारा उन्हाचा चटका फेब्रुवारीच्या पहिल्यात आठवड्यापासून जाणवू लागला आहे. गेल्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात एक ते दीड अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. पहाटेच्याही किमान तापमानात एक अंशाने वाढ झाल्यामुळे विरळ धुके पडत असून, गारवाही कमी झाला आहे.
दरम्यान, लोणावळा येथे ३८.१ अंश सेल्सिअस, तळेगाव ३७.६, पुरंदर ३६.५, मगरपट्टा ३६, एनडीए आणि शिवाजीनगर ३५.८, पाषाण ३५.३, वडगावशेरी ३५, हवेली ३४.८, बारामती ३४.२, आंबेगाव ३३.५ तर भोरमध्ये ३२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.