ढोले पाटील महाविद्यालयातर्फे श्रमदान
पुणे, ता. २५ : ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी लोहगड किल्ल्यावर श्रमदान केले.
महाविद्यालयाचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोहगड येथे झालेल्या शिबिरात विद्यार्थ्यांनी श्रमदानातून किल्ल्याची साफसफाई केली. गावातील विविध मंदिरे, शिवस्मारक, जिल्हा परिषद शाळा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली.
संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजी महाराज मोरे, लोहगड विसापूर विकास मंचाचे शिवदुर्ग संवर्धक सचिन टेकवडे, महादेव वाघमारे, रमण बेडेकर, ब्रह्मानंद मंडल यांनी व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचालक रौनक ढोले पाटील, ओमप्रकाश राजनकर उपस्थित होते. समारोपावेळी श्यामसुंदर माडेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

