हिंजवडीत स्वतंत्र उपविभागाची महावितरणकडे मागणी

हिंजवडीत स्वतंत्र उपविभागाची 
महावितरणकडे मागणी
Published on

पुणे, ता. २५ : हिंजवडीत नागरीकरण वाढत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. सद्यःस्थितीत महावितरणच्या या भागातील पायाभूत सुविधा व कर्मचारी संख्या मर्यादित असल्याने वीज सेवा सुरळीतपणे पुरवता येत नाही. परिणामी, नागरिकांना व उ‌द्योगांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंजवडी परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभाग स्थापन करण्याची मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे.
याबाबत मांडेकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना निवेदन दिले. हिंजवडी परिसर महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारा परिसर आहे. येथे माहिती तंत्रज्ञान कंपन्या, तसेच निवासी संकुले मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या भागातील वीज पुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या हिंजवडी हा भाग महावितरणच्या सांगवी उपविभाग कार्यालयामध्ये समाविष्ट आहे. हिंजवडी आणि परिसरामध्ये अंदाजे महावितरणचे दीड लाख ग्राहक आहेत. तेथे एक अभियंता आणि २० तांत्रिक कर्मचारी आहेत. या भागातून महावितरणला अंदाजे दरमहा शंभर कोटींच्या वर उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे या भागात महावितरणचा स्वतंत्र उपविभाग स्थापन करणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com