‘पूजनीय श्रीगुरूजी पुरस्कार’ जाहीर
पुणे, २५ : राजस्थानमधील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरूजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. पुण्यात शनिवारी (ता. १) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात हे पुरस्कार प्रदान केले जातील. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर उपाख्य श्रीगुरूजी यांच्या जयंतीदिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे यंदा ३० वे वर्ष आहे. ‘जनकल्याण समिती’चे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी मंगळवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. संस्थेचे कार्यवाह प्रमोद गोऱ्हे यावेळी उपस्थित होते. पुरस्कार सोहळ्यासाठी संकेश्वर पीठाचे श्री स्वामी शंकराचार्य प्रमुख पाहुणे तर संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल प्रमुख वक्ते असतील.
राजस्थानातील कोटा येथील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ने गो-आधारित जैविक कृषी विकासासाठी भरीव कार्य केले असून स्वदेशी बीज बँक, देशातील पहिले सेंद्रिय शेती संशोधन केंद्र या संस्थेने सुरू केले आहे. शेतीच्या क्षेत्रातील अनेक यशस्वी प्रयोग ही संस्था सातत्याने करत आहे. पी. आर. श्रीजेश यांनी क्रीडा क्षेत्रावर मोहोर उमटवली असून भारतीय हॉकी संघाचे कर्णधार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१७ मध्ये पद्मश्री आणि यंदा पद्मभूषण पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आला आहे. अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

