कात्रजच्या जयक्रांती महाविद्यालयाला महाविजेतेपद
पुणे, ता. २५ : उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आणि निलया एज्युकेशन ग्रुप प्रस्तुत सकाळ यिन कला महोत्सवाचा महाविजेतेपदाचा चषक कात्रजच्या जयक्रांती महाविद्यालयाने पटकावला. अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाला उपविजेतेपद मिळाले. चुरशीने झालेल्या कला महोत्सवातील स्पर्धेत स्पर्धकांनी चमकदार कामगिरी करत रंगत वाढवली.
महाविद्यालयातील तरुणाईने या कला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्यातील अंगभूत कलागुणांचे सादरीकरण केले. दोन दिवस रंगलेल्या या कला महोत्सवात पुणे शहरातील तसेच ग्रामीण भागांतील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, निलया एज्युकेशन ग्रुपचे संस्थापक संचालक निलय मेहता, विश्वकर्मा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे विद्यार्थी समन्वयक कौसल्या थोपटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. सकाळ यिन कला महोत्सव स्पर्धेत परीक्षक म्हणून आलेल्या मान्यवरांचा या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ऋतुजा बडगुजर आणि शार्वी जोशी यांनी केले. यिनचे पुणे शहर अधिकारी शंतनू पोंक्षे यांनी आभार मानले. आरती पाठक, चेतन चावडा, आसावरी नितीन, सागर पवार, शैलेश देशमुख, मुक्ता ढवळे, सोनाली सिंग, स्नेहा गरुड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यिनच्या कोअर टीमचे परिश्रम
यिन कला महोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची सोशल वेल्फेअर डेव्हलपमेंट कमिटीतील सदस्य, पुणे यिन टीम या सर्वांनी यासाठी परिश्रम घेतले. तसेच या संपूर्ण नियोजनात संस्थेचे अध्यक्ष, महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कला तसेच क्रीडा महोत्सव होणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थीदशेत आपल्यातील अंगभूत कला गुणांना व्यासपीठ मिळावे, असे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असून, हे स्वप्न यिनच्या माध्यमातून सत्यात उतरत असून विद्यार्थ्यांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
- सावळाराम साळगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
तरुणाईच्या सर्जनशक्तीने नटलेल्या या कला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धांनी संपूर्ण वातावरणात ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले. ‘यिन’सारख्या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची प्रेरणा सदैव जागृत राहते. सर्व विजेत्यांना व स्पर्धकांना विश्वकर्मा विद्यापीठातर्फे हार्दिक शुभेच्छा.
- भरत अगरवाल, अध्यक्ष, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि विश्वकर्मा विद्यापीठ
नावीन्यपूर्ण संकल्पना, सजनशीलता आणि कलात्मकतेची सुंदर मांडणी या वर्षीच्या सकाळ यिन कला महोत्सवात अनुभवायला मिळाली. तरुणांनी केलेले सादरीकरण पाहताना खूप आनंद वाटत होता. निलया एज्युकेशन ग्रुपला या कार्यक्रमाला हातभार लावायची संधी मिळाली, याचा अभिमान वाटत होता.
- निलय मेहता, संस्थापक-संचालक, निलया एज्युकेशन ग्रुप
सविस्तर निकाल (प्रकार व अनुक्रमे पहिले तीन विजेते)
१) एकपात्री अभिनय ः स्नेहा शर्मा, दिव्या वानखेडे, रितू काटे
२) ग्रुप डान्स ः निखिल भाग्यवंत, लक्ष्मी शिर्के, बेन अँड सॅम
३) फॅशन शो (मुलगे) ः सिद्धार्थ मानुरकर, अथर्व, भूषण निकम
४) फॅशन शो (मुली) ः राखी शुक्ला, पायल शिंदे, अनुजा बोगा
५) स्टॅन्ड अप कॉमेडी ः स्वरूप मिश्रा, आफ्रिद शेख, प्रणोती मोहिते
६) मूकाभिनय ः अनिकेत जगताप, पवन माळी, सुजल गायकवाड
७) रॅप ः विक्रमादित्य भोसले, युवराज पिल्ले, रितेश साळवे
८) काव्यवाचन ः स्वरूप मिश्रा, भक्ती ढवळे, वैष्णवी शेडगे
९) पथनाट्य ः व्हीआयटी कॉलेज ग्रुप, कर्वे समाज सेवा संस्था ग्रुप, जयक्रांती महाविद्यालय ग्रुप
१०) एकल गायन ः नारायणी गरगटे, वैष्णवी शेडगे, शोएब शेख
११) वादविवाद ः आदित्य रंजन, तेजस्वी तिवारी, अनुष्का आनंद
१२) वक्तृत्व ः अनुष्का आनंद, स्नेहा शर्मा, तनुश्री निपाणीकर
१३) स्किट सादरीकरण ः अनिकेत जगताप, साक्षी कांबळे, पवन माळी
१४) रांगोळी ः मृणाली पाटील, राघवी नारायणन, राशी ओझा
१५) चित्रकला ः प्रतीक दोरगे, शुभांगी मिठे, पार्थ सुतार
१६) एकल नृत्य ः लेखा बारभाई, तनिष्का जावकर, श्रुती चव्हाण
१७) मेहंदी ः साकिना खान, सोनाली जरंडे, मीनाक्षी वाटकर
१८) व्यंग्यचित्र ः प्रतीक दोरगे, लक्ष्मी राजभर, निधी शिंदे
१९) फोटोग्राफी ः मल्लिनाथ बिराजदार, पूर्वा दौंडकर, कौस्तुभ शिरीनवार
२०) कोलाज वर्क ः वैष्णवी रणावरे, सुजित बिरारी, स्मृती ढमाले
२१) क्ले वर्क ः रोशनी गुप्ता, सोहम आखाडे, प्रज्ञा चव्हाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

