आज पुण्यात २६ फेब्रुवारी २०२५ बुधवार
आज पुण्यात २६ फेब्रुवारी २०२५ बुधवार
........................................................
सकाळी ः
महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम ः कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर आयोजित ः महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड व मुखवटा (उज्जैनमधील महाकालेश्वर) ः कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर, बुधवार पेठ ः ९.००.
ग्रंथपूजन ः कथाभारतीतर्फे ः स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त ग्रंथपूजन ः हस्ते- डॉ. मेधा कुलकर्णी ः उपस्थित- माधुरी सहस्रबुद्धे, श्याम भुर्के, डॉ. अनुजा कुलकर्णी, गीता भुर्के ः स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, कर्वे रस्ता ः ९.४५.
प्रदर्शन ः स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि अध्यासन केंद्र आयोजित ः भारतीय सशस्त्र दलाची शौर्यगाथा प्रदर्शन- ऐतिहासिक युद्धातील दुर्मीळ छायाचित्रे, नकाशे व दस्ताऐवजांचे प्रदर्शन ः स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, कर्वे रस्ता ः १०.००.
सायंकाळी ः
गंधर्व महोत्सव ः महाराष्ट्र शासनाच्या कार्य संचालनातर्फे ः पंडित कुमार गंधर्व महोत्सव ः सहभाग- पं. सत्यशील देशपांडे, विदुषी सानिया पाटणकर, पुष्कर लेले ः अरुंधती पटवर्धन व सहकाऱ्यांचे भरतनाट्यम ः एमईएस सभागृह, मयूर कॉलनी कोथरूड ः ५.००.
सांस्कृतिक कार्यक्रम ः पुणे पुस्तक महोत्सव आयोजित ः मराठी राजभाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त ‘सावरकर ते शिरवाडकर’ कार्यक्रम ः फ. मुं. शिंदे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार ः हस्ते- आशिष शेलार ः बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर ः ५.३०.
पारितोषिक वितरण ः महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशन आयोजित ः दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ः हस्ते- सतीश आळेकर, राजीव खांडेकर ः अध्यक्ष- मिलिंद जोशी ः उपस्थिती- डॉ. सतीश देसाई, सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः ६.००.
...........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

