नामदार गोपाळकृष्ण गोखले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम
पुणे, ता. २५ : महात्मा गांधी यांचे गुरू आणि समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले यांच्या १५७ व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय संघटनेतर्फे विशेष कार्यक्रम उत्साहात झाला.
ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांनी गोखले यांच्या विचारधारेवर व्याख्यान देऊन महात्मा गांधींवरील त्यांच्या प्रभावावर प्रकाश टाकला. तसेच, गोखले यांच्या भाषणांतील सहकार्याच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. गोपाळ कृष्ण गोखले व महात्मा गांधी यांच्यातील गुरूशिष्यत्वाचा धागा त्यांनी स्पष्ट केला. तसेच गोखले यांच्या भाषणांना इंग्रजांनी दिलेल्या सहमतीची माहिती दिली.
या वेळी गोखले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे, ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई, मुद्रणालयाचे व्यवस्थापक चंद्रशेखर सातपुते आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

