‘माझी जन्मठेप’ रंगमंचीय 
नाट्य आविष्कार आज

‘माझी जन्मठेप’ रंगमंचीय नाट्य आविष्कार आज

Published on

पुणे, ता. २५ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राहक पेठेतर्फे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहयोगाने ‘माझी जन्मठेप’ अभिवाचनाच्या रंगमंचीय नाट्य आविष्काराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी (ता. २६) रात्री साडेनऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अभिवाचन नाटक होणार आहे. नाटकासाठी विनामूल्य प्रवेश असून, मोफत प्रवेशिका टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेत मिळणार आहेत, अशी माहिती सूर्यकांत पाठक यांनी दिली.
या कार्यक्रमात नरेंद्र सदाशिव घोणे यांचा विशेष सन्मान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अभिवाचन नाट्याविष्काराची संकल्पना अनंत वसंत पणशीकर यांची आहे, तर दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर, संकलन अलका गोडबोले, नेपथ्य संदेश बेंद्रे, शब्दाचार मार्गदर्शन सुभाष सावरकर, संगीत मयूरेश माडगावकर यांचे आहे. जान्हवी दरेकर, मुग्धा गाडगीळ बोपर्डीकर, गौरव निमकर, समर्थ कुलकर्णी, शंतनू अंबाडेकर, नवसाजी कुडव हे कथन कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com