मौखिक आरोग्य जनजागृती प्रदर्शनाचे शुक्रवारी आयोजन

मौखिक आरोग्य जनजागृती 
प्रदर्शनाचे शुक्रवारी आयोजन
Published on

पुणे, ता. २५ : ‘इंडियन डेंटल असोसिएशन’तर्फे मौखिक आरोग्य जनजागृतीच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी (ता. २८) जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.

प्रदर्शनात विविध वस्तूंची विशिष्ट घटकांनुसार मांडणी केली जाणार आहे. मौखिक आरोग्य आणि सर्वांगीण आरोग्याचे नाते, लहान मुलांच्या दुधाच्या दातांचे आरोग्य, पालकांना काय महत्त्वाचे माहीत हवे, ज्येष्ठ नागरिक तसेच, तंबाखू निवारण असे अनेक महत्त्वाचे घटक तसेच, दंतवैद्यकीय शास्त्राच्या इतिहासाची माहिती, आधुनिक उपचारपद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करत प्राथमिक दंतचिकित्सा मशिनचे प्रात्यक्षिक, दात घासण्याची योग्य पध्दत, त्यावर प्रत्यक्ष हात चालवत शिकता येणार आहे. यासाठी अनेक भित्तिचित्रे, फलके, फोटो, यांचा वापर केला आहे. वेगवेगळे दातांचे मॉडेल्स, ठसे तसेच दातांची आरोग्याशी निगडित खेळणीही असतील.
प्रदर्शनाचे उद्‌घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. राजन संचेती, ‘आयडीए’ मुख्य कार्यालयाचे ‘सेक्रेटरी जनरल’ डॉ. अशोक ढोबळे यांच्या हस्ते होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन दंतरोगतज्ज्ञ व ‘आयडीए’ पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. भक्ती दातार यांनी केले. याप्रसंगी डॉ. नितीन बर्वे, डॉ. मंजिरी जोशी, डॉ. सुप्रिया गणेशवाडे आदी उपस्थित होते.

महापालिका शाळांना प्रथमोपचार पेटी
मौखिक आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांना दातांच्या प्रथमोपचार पेटीचे संघटनेतर्फे नुकतेच वाटप करण्यात आले. याप्रसंगी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडे या पेट्या सुपूर्त केल्या. या वेळी साहित्याची माहिती व वापरण्याबाबतच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com