मतदार यादी दुरुस्त करा, मगच निवडणूक घ्या
पुणे, ता. २४ ः महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादी सदोष आहेत. अशा सदोष मतदार याद्यांचा वापर करून निवडणूक घेऊ नये. अगोदर मतदार यादी पूर्णपणे दुरुस्त करावी. त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका प्रशासनाकडे केली.
मतदार याद्यांमधील गोंधळ, दुसऱ्या प्रभागांमध्ये मतदारांची नावे जाण्यापासून ते ग्रामीण भागातील व्यक्तींची नावे महापालिकेच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झाली आहे, याबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेतली. या वेळी आमदार बापू पठारे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागसकर, अंकुश काकडे, ॲड. जयदेव गायकवाड, अरविंद तायडे, ॲड. अभय छाजेड, अश्विनी कदम, रवींद्र माळवदकर, मनोहर जांबूवंत, सचिन दोडके यांच्यासह आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आदीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप मतदारयादी नुकतीच जाहीर झाली. संबंधित यादी सदोष असून, त्यामध्ये तीन लाखांपेक्षा जास्त मतदारांची दुबार नोंदणी असल्याची कबुली महापालिका आयुक्तांनी दिली असल्याचे या वेळी अतिरिक्त आयुक्तांना सांगण्यात आले. अनेक ठिकाणी मतदारांना गैरसोयीचे होईल, अशा पद्धतीने त्यांच्या मतदानाची नोंदणी दूरच्या प्रभागात केली आहे. त्यावरून महापालिका प्रशासन सत्ताधारी भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याची शंका येत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. संबंधित यादीवर हरकती नोंदवण्यासाठीही कमी कालावधी दिला आहे. त्यामध्ये सुधारणा करावी. सदोष मतदार यादी तातडीने दुरुस्त करावी, मतदार यादी दुरुस्त झाल्यानंतरच निवडणूक घ्यावी, तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी मागणी शिष्टमंडळाने दिवटे यांच्याकडे केली.
---------------
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागामध्ये जाण्याचे प्रकार घडले असल्याचे सांगितले आहे. त्याची दखल घेऊन सुधारणा करण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
-ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

