दरवाढीनंतरही ‘पीएमपी’चा प्रवास सुखकर
पुणे, ता. ११ ः ‘पीएमपी’ प्रशासनाने बहुप्रतिक्षित दरवाढ लागू करून आठवडा उलटला. या दरम्यान प्रवासी संख्या घटेल असा कयास होता. मात्र प्रवाशांनी ‘पीएमपी’ची साथ सोडलेली नाही. दरवाढीनंतर देखील प्रवाशांची संख्या ‘जैसे थे’ आहे. उत्पन्नात मात्र मोठी वाढ झाली आहे. सरासरी दररोज सुमारे ५० लाखांची वाढ झाली असून यातून वर्षाला सुमारे २०० कोटींचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज ‘पीएमपी’ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाने ११ वर्षानंतर दरवाढीचा निर्णय घेतला. एक जूनपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. विविध प्रवासी संघटना, वाहतूक तज्ज्ञ, राजकीय पक्ष यांनी दरवाढीचा निषेध केला. दरवाढीनंतर सुमारे ३० टक्के प्रवाशांना याचा फटका बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली. मात्र ‘पीएमपी’ प्रशासनाला प्रवासीही राहतील अन् उत्पन्न वाढेल यावर विश्वास होता. दरवाढीच्या पहिल्याच दिवशी एक दिवसीय उत्पन्न सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत पोचले. रविवार असूनदेखील ही स्थिती अतिशय चांगली होती. आता दरवाढीला आठवडा उलटून गेला. पहिल्या आठवड्यात प्रवासी उत्पन्नात चांगली वाढ झाली.
आकडे बोलतात
तारीख प्रवासी संख्या प्रवासी उत्पन्न
१ जून ९ लाख ४५ हजार ९७१ १ कोटी ९७ लाख १७ हजार ४०३
२ जून १० लाख ९४ हजार ७६९ २ कोटी ३५ लाख ७७ हजार ९८८
३ जून १० लाख ५३ हजार ९०९ २ कोटी २६ लाख ६४ हजार ३५६
४जून ९ लाख ९२ हजार ५४० २ कोटी ११ लाख १५ हजार १९६
५ जून १० लाख ५८ हजार ३०२ २ कोटी २६ लाख ८९ हजार १३४
६जून १० लाख २० हजार ५८० २ कोटी १५ लाख ५८ हजार ५१७
७ जून ९ लाख २४ हजार ७३४ १ कोटी ९४ लाख १३ हजार ०१३
८ जून ९ लाख १८ हजार ०४० १ कोटी ९३ लाख ४७ हजार २८३
प्रवासी आणखी वाढणार
लवकरच शाळा व महाविद्यालये सुरू होतील. त्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होईल. प्रवासीसंख्या वाढली की आपसूकच प्रवासी उत्पन्नदेखील वाढेल. आणखी किमान ४० ते ५० हजारांनी प्रवासीसंख्या वाढण्याची अपेक्षा ‘पीएमपी’ प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पीएमपी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवाढीचा निर्णय घेतला. याचा ‘पीएमपी’ला नक्कीच फायदा होईल.
- दीपा मुधोळ मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.