‘डिझाईन मेळा’ निमित्त आजपासून प्रदर्शन

‘डिझाईन मेळा’ निमित्त आजपासून प्रदर्शन
Published on

पुणे, ता. ११ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्सच्या (आयआयआयडी) पुणे प्रादेशिक विभागातर्फे ‘डिझाईन मेळा’ या अभिनव संकल्पनेतून गुरुवार (ता. १२) ते शनिवारपर्यंत (ता. १४) भव्य प्रदर्शन डीपी रस्त्यावर राजाराम पुलाजवळ महालक्ष्मी लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. या अनोख्या उपक्रमात शहरातील नामवंत डिझायनर्सच्या सुमारे १०० हून अधिक प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.

प्रत्येक प्रकल्पाचे सुमारे दोन मिनिटांचे सादरीकरण विशेष स्क्रीनवर सलग तीन दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. इंटिरियर डिझाईनसाठी उपयुक्त असलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्सही या प्रदर्शनात आहेत. या डिझाईन मेळ्याचे उद्‌घाटन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता होणार आहे.

हा डिझाईन मेळा १२, १३ आणि १४ जूनपर्यंत सुरू राहणार असून सर्वांना खुला प्रवेश आहे. त्यामध्ये विविध कार्यशाळा, इंटिरियर डिझाईनशी संबंधित मार्गदर्शन सत्रे आणि विद्यार्थ्यांसाठी खास शैक्षणिक उपक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत. इंटिरियर डिझाईन व संबंधित क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा ‘डिझाईन मेळा’ ही एक उत्तम संधी असल्याचे ‘आयआयआयडी’चे मानद सचिव राजेश पुराणिक यांनी म्हटले आहे. मेळ्यात गुरुवारी (ता. १२) सकाळी १० ते दुपारी एक दरम्यान दहावी - बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ‘करिअर मार्गदर्शन’ कार्यशाळा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com