‘आई माझं दप्तर घेऊन येणार आहे ना?

‘आई माझं दप्तर 
घेऊन येणार आहे ना?
Published on

बिबवेवाडी, ता. ११ : ‘‘माझी आई दप्तर आणायला गेली होती, तिला बोलवा...’’, सात वर्षांची मुलगी गार्गी आतुरतेनं आईची वाट पाहत होती. पण तिला पुसटशीही कल्पना नव्हती की आई आता कधीच परत येणार नाही. गार्गीच्या या हळव्या प्रश्नाने उपस्थितांचे मन हेलावले.
गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात दीपाली सोनी यांचा मृत्यू झाला. मुलीचं शालेय दप्तर घेण्यासाठी त्या शाळेत गेल्या होत्या. सासऱ्यांसमवेत येताना अपघातात दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला. दीपाली यांना ११ वर्षांचा मुलगा विराज आणि सात वर्षांची मुलगी गार्गी आहे. बुधवारी सकाळी घरातून निघताना दीपाली गार्गीला म्हणाल्या होत्या की, ‘‘तुझं दप्तर घेऊन येते गं!’’ पण हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
सोनी कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे. गेली अनेक वर्षे पुण्यात स्थायिक आहेत. त्यांचा पान विक्रीचा व्यवसाय असून परिसरात ते परिचित आहेत. दीपाली यांच्या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. एक आई आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी बाहेर पडली आणि काळाने तिला गाठले... मात्र आई दप्तर घेऊन येणार म्हणून गार्गी दरवाजाकडे मोठ्या आतुरतेने तिची वाट पाहत उभी होती. या प्रसंगाने सर्वजण भावुक झाले होते.

तुमचे मत मांडा...
गंगाधाम चौकातील ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे सासरे गंभीर जखमी झाले. या भागात भरधाव अवजड वाहनांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत तुमचे मत मांडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com