इयत्ता अकरावीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

इयत्ता अकरावीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
Published on

पुणे, ता. ११ : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी (ता. ११) जाहीर झाली आहे. या अंतिम यादीत ११ लाख ३८ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित फेरीअंतर्गत प्रवेशासाठी कोणते महाविद्यालय मिळाले, हे २६ जूनला जाहीर होणार आहे.

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी पाच जूनला जाहीर करण्यात आली. त्यानंतर बुधवारी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये गुणवत्ता यादीतील क्रमांक दिसेल. अंतिम यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शून्य फेरीत व्यवस्थापन, संस्थेअंतर्गत, अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत प्रवेश घेता येणार आहे.

पहिल्या नियमित कॅप प्रवेश फेरीत गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थी व कनिष्ठ महाविद्यालय निवड वाटप प्रक्रिया १७ जूनला होईल. तर, प्रवेश फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयनिहाय विद्यार्थी वाटप यादी आणि विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये कनिष्ठ महाविद्यालय वाटप तपशील २६ जूनला जाहीर होणार आहे. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २७ जून ते तीन जुलै या कालावधीत प्रत्यक्ष प्रवेश घेता येईल, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

अशी असेल शून्य प्रवेश फेरी
शून्य प्रवेश फेरी १२ ते १४ जून दरम्यान राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शून्य फेरीत कोट्याअंतर्गत विद्यार्थ्यांस मिळालेले कनिष्ठ महाविद्यालय मान्य असल्यास ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आणि संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून दिलेले शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com