‘चले जाओ’चा नारा 
पुन्हा घुमला...

‘चले जाओ’चा नारा पुन्हा घुमला...

Published on

पुणे, ता. ८ ः इन्कलाब जिंदाबाद..., आज का दिन क्रांतिदिन..., क्रांतिकारी अमर रहे...,
भारत माता की जय..., वंदे मातरम..., अशा जोशपूर्ण घोषणा आकाशाला भिडत होत्या. सभोवती देशभक्तीच्या गाण्यांचे सूर तरंगत होते आणि प्रत्येक पावलागणिक घोषणांचा आवाज वाढत होता. हा क्षण केवळ स्मरणाचा नव्हता तर क्रांतीच्या विचारांना पुन्हा चेतविण्याचा होता.
क्रांतिदिनानिमित्त व १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे क्रांतिज्योत यात्रा झाली. कॉंग्रेस भवन ते मंडई येथील हुतात्मा बाबू गेणू स्तंभापर्यंत ही यात्रा झाली. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, पुणे जिल्हा शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक अजित दरेकर, कमल व्यवहारे, रफिक शेख, माजी आमदार दीप्ती चौधरी, यांसह माजी नगरसेवक लता राजगुरू, प्राची दुधाणे, सीमा सामंत आदी उपस्थित होते.
छाजेड म्हणाले, ‘‘हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक एक टप्पा आहे. भारत छोडो आंदोलनामार्फत ब्रिटिश सत्ते विरोधात महात्मा गांधींनी एक अंतिम लढा दिला. हे आंदोलन चिरडण्याचा इंग्रजांनी आटोकाट प्रयत्न केला. देशातील सर्व प्रमुख नेत्यांना त्यावेळी तुरुंगवास भोगावा लागला. परंतु नेता विरहित परिस्थितीत स्वातंत्र्याचा विचार घरोघरी पोहोचविण्याचे कार्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले.’’
शिंदे म्हणाले, ‘‘देशात लोकशाहीची गळचेपी होत आहे. सरकार मतदानाचा संविधानिक हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारलाच आता ‘चले जाओ’ बोलण्याची वेळ आली आहे. आपल्या संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्रित आले पाहिजे, तसेच आपल्या अधिकारांबाबत जागृत झाले पाहिजे.’’
हुतात्मा बाबू गेणू चौकातील क्रांती स्तंभाला पुष्पहार अर्पण करून यात्रेचा समारोप झाला.
------------
फोटो ः 15829

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com