पुणे
आनंदाश्रम संस्थेतर्फे विविध स्पर्धा
पुणे, ता. ९ : संस्कृत दिनाच्या निमित्ताने आनंदाश्रम संस्थेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यात संस्कृत स्तोत्र पाठांतर, प्रश्नमंजूषा, नाट्यवाचन आणि वक्तृत्व या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांत विविध शाळेतील तिसरी ते दहावीच्या ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रमुख पाहुण्या डॉ. शैलजा कात्रे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी अपर्णा आपटे, दिलीप आपटे व संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाला सांघिक ट्रॉफी देण्यात आली. संस्कृत सेवा फाउंडेशनतर्फे सातवी ते दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आले. श्यामला बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. मानसी रांजणीकर यांनी आभार मानले.