कोयते लपविण्यासाठी आईची साथ

कोयते लपविण्यासाठी आईची साथ

Published on

पुणे, ता. १० : हडपसर पोलिसांनी सरार्इत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार कोयते जप्त करण्यात आले आहे. एका अल्पवयीन आरोपीच्या घरात त्याच्या आईच्या परवानगीने कोयते लपविण्यात आले होते, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आईला सहआरोपी केले आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विश्वजित ऊर्फ यश रामचंद्र मोरे (वय २०, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मोरे याच्यासह त्याचा अल्पवयीन साथीदार आणि त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांकडून शुक्रवारी रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांतील सराईत गुन्हेगारांची अचानक तपासणी करण्यात आली. हडपसर ठाण्यातील तपास पथकाने या कारवाईत विश्वजित आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. दोघांची चौकशी करण्यात आली. त्यात अल्पवयीनाने घरात कोयते ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांच्या घरातून चार कोयते जप्त केले.
हडपसर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश जगदाळे, अश्विनी जगताप, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, अमित साखरे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजित राऊत आणि महेश चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पालकांवरही दाखल होतोय गुन्हा
गुन्हेगारी कृत्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा देणाऱ्या पालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. किरकोळ वादातून वाहनांची तोडफोड केली जाते, तसेच कोयते उगारून दहशत पसरविण्याच्या घटना घडतात. कोयत्यांच्या धाक दाखवून नागरिकांना धमकाविले जाते. त्यामुळे आता कोयते उगारून दहशत पसरविणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com