महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण

महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण

Published on

पुणे, ता. ११ : प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करत त्यांची एजंट नोंदणी रद्द करण्याचा आदेश महारेराने दिला आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच ११ ऑगस्टपासून सुरु होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

एनजीओ नोंदणीबाबत
प्राथमिक, प्रगत प्रशिक्षण
विविध कामांसाठी स्वयंसेवी संस्था अर्थात ‘एनजीओ’ना प्राधान्य दिले जाते. याद्वारे विकास, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. अशा या स्वयंसेवी संस्थेची स्थापना, नोंदणी, निधीची उभारणी, संस्थेची कामकाज पद्धती, सीएसआरचे सहकार्य, प्रशासकीय व्यवस्थापन अशा स्वयंसेवी संस्थांशी निगडित माहिती देणारे प्राथमिक प्रशिक्षण १६ ऑगस्टला तर प्रगत प्रशिक्षण १७ ऑगस्टला आयोजिले आहे. यात संस्थेची स्थापना कशी करावी, प्रशासकीय दस्तऐवजीकरण, धर्मादाय आयोग व इतर सरकारी विभागांशी संपर्क कसा साधावा, प्रस्ताव तयार करणे व सादर करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, वार्षिक ताळेबंद, अहवाल, शासकीय योजनांची अंमलबजावणी, कागदपत्रे इ.विषयी मार्गदर्शन होईल.
संपर्क : ८४८४८११५४४

रिअल इस्टेट एजंटसाठी
डिजिटल मार्केटिंग
खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा १८ ऑगस्टपासून सुरु होत आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात, त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगएवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. कोणत्याही कंपनीच्या किंवा संस्थेच्या प्रगतीत मार्केटिंग महत्त्वाची भूमिका बजावत असते. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग डिजिटल मार्केटिंग कसे करावे याचे प्रगत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित कार्यशाळेत होणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२

ब्यूटी इंडस्ट्रीतील नवीन करिअर
कोरियन ग्लास स्कीन टेक्निकद्वारे पारंपरिक पद्धतींना मागे टाकत, ब्युटी व्यवसायाला एक नव्या उंचीवर नेण्याची संधी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारा सेमिनार २० ऑगस्टला आयोजिला आहे. सेमिनारमध्ये कोरियन स्कीन ट्रीटमेंटची मूलतत्त्वे आणि कार्यपद्धती, ग्राहकांसाठी योग्य ट्रीटमेंट डिझाईन कशी करावी, स्कीन कन्सल्टेशन, स्कीन मॅपिंग आणि पोस्ट-ट्रीटमेंट मार्गदर्शन, व्यावसायिक पॅकेजेस कसे तयार करायचे आणि विकायचे याबाबत प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती दिली जाणार आहे. सलून मालक, ब्युटीशियन, मेकअप आर्टिस्ट किंवा एस्थेटिशियन यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com