माणमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
पुणे, ता. ११ ः हिंजवडी, माण भागात सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेने पाऊल टाकले असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यात येणार आहेत. माण ग्रामपंचायत भागात चार एमएलडी क्षमेतचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. त्याचबरोबर माणसह इतर गावांमध्ये घनकचरा प्रकल्प करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) जागेची मागणी केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागातील घनकचरा आणि सांडपाण्याची समस्या वाढत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने आता पुढाकार घेतला आहे. मागील काही दिवसांपासून हिंजवडी आयटी पार्क भागातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौरे केले. पायाभूत सुविधा उभारण्याच्या सूचना केल्या. त्यापैकी आता जिल्हा परिषदेकडून सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. माणमध्ये होणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हा चार एमएलडी क्षमतेचा असून त्यासाठी साधारण तेरा कोटी रुपयांची आवश्यकता आहे, नमामि चंद्रभागा योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी जागाही उपलब्ध आहे; तर माणमधील घनकचरा प्रकल्पासाठी निधी हा स्वच्छ भारत अभियान ग्रामपंचायत असा एकत्रितपणे उभा केला जाईल आणि जागेसाठी ‘पीएमआरडीए’ला प्रस्ताव दिला आहे, असेही पाटील यांनी सांगितले. याशिवाय माणबरोबरच ओतूर आणि कदमवाकवस्ती येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प केला जाणार आहे. हा प्रकल्प खासगी संस्थेच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे.
विविध कामांसाठी जागेचा प्रस्ताव
शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्रक्रिया प्रकल्पांसाठी नाणेकरवाडी, सोमाटणे, पिरंगुट, भुकूम, भूगाव आणि माण यांसारख्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव ‘पीएमआरडीए’ला पाठविण्यात आला आहे. याशिवाय, मारुंजी येथे शाळेसाठी जमीन देण्याबाबतही प्रस्ताव पाठवला आहे. त्याचबरोबर म्हाळुंगे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गायरानच्या जागेची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले.
अतिक्रमणे काढण्यास सुरुवात
हिंजवडी येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा परिषद प्रशासनाने हिंजवडी भागातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. एका ओढ्यावरील भाजी मंडईसाठी केलेले बांधकाम काढण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.