पुण्याच्या मुख्य डाकघराची आज शताब्दी

पुण्याच्या मुख्य डाकघराची आज शताब्दी

Published on

पुणे, ता. १३ ः पुणे शहराच्या मुख्य टपाल इमारतीची अर्थात मुख्य पोस्ट ऑफिसची इमारत आपली शताब्दी साजरी करत आहे. गुरुवारी (ता. १४) या ‘डाकघराला’ १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
बुधवार पेठेतील ही प्रधान डाकघराची इमारत केवळ एक कार्यरत पोस्ट ऑफिस नाही; तर शहराच्या इतिहासाचे, वास्तुकलेचे आणि संस्कृतीचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात अजूनही कार्यरत असलेल्या सर्वांत जुन्या डाकघरांपैकी हे एक आहे. दोन एकराच्या परिसरात ही इमारत आजही डौलाने उभी आहे.
या मूळ इमारतीचा आराखडा कर्नल फिंच यांनी तयार केला होता. वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य शैलीसाठी ही इमारत ओळखली जाते. या इमारतीच्या बांधकामासाठी त्यावेळी १९,७१० रुपये खर्च आला होता. या इमारतीत वेगवेगळ्या विभागांसाठी विस्तृत जागा, त्यांची स्थानिक आवश्यकता आणि मोठ्या खिडक्यांमधून प्रकाश व खेळती हवा यांचा अधिक चांगला उपयोग केला गेला.

महत्त्वाचे
- ही इमारत टस्कन शैलीमध्ये तयार
- पॅलेडियन पद्धतीने मोठ्या खिडक्या
- मध्यवर्ती भागात पोर्च, विस्तीर्ण मंडप आणि प्रोट्रेशन्ससारखे दात असलेले कॉर्निसेस सुरेखपणात घालते भर
- २००० मध्ये पुणे महापालिकेने या इमारतीचा समावेश वारसा वास्तूंच्या पहिल्या श्रेणीत केला
- ही इमारत १६व्या शतकातील इटालियन वास्तुविशारद आंद्रिया पॅलाडिओ यांच्या स्थापत्य शैलीचे प्रतिबिंब दाखवते, तसेच ब्रिटिश वसाहतवादी काळाची आठवण करून देते

ही इमारत १८७३-७४च्या काळात बांधली गेली, असे काही उल्लेख आहेत. मात्र इमारतीवर १९२५चा उल्लेख आहे. त्यामुळे अधिकृत उल्लेख गृहित धरता यंदा या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त गुरुवारी (ता. १४) एका छोटेखानी शताब्दी समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे.
- विलास घुले, वरिष्ठ पोस्टमास्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com