एक लाख एलईडी दिव्यांचे साकारणार गणेश मंदिर
नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट
७३९, बुधवार पेठ, गणेश रोड, तपकीर गल्ली
नेहरू तरुण मंडळाची स्थापना १९३९ मध्ये करण्यात आली. मंडळ यंदा ८६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाची ‘महोत्कट गणेश’ रुपी श्रीं ची मूर्ती असून, ही मूर्ती सरदेशमुख आणि चिंतामणी जवारी यांनी घडविली आहे. या गणरायाच्या मूर्तीच्या पोटामध्ये सिद्ध गणेश यंत्र बसविण्यात आले असून, गणपतीची मूर्ती ही उभी आहे. मंडळातर्फे अनेक सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा विषयक आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. मंडळाला विघ्नहर्ता न्यास, पुणे फेस्टिवल, बाप्पा माझा अशी अनेक पारितोषिके मिळाली आहेत. मंडळातर्फे दरवर्षी गणेश जन्म, शिवजयंती उत्सव, शाही दसरा उत्सव आयोजित केले जातात. दरवर्षीची परंपरा जपत यंदाच्या वर्षीही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः उत्सवासाठी उत्सव मंडपात एक लाख ‘एलईडी’ दिव्यांचा नयनरम्य असे मंदिर साकारले आहे आणि विसर्जन सोहळ्यासाठी दोन लाख ‘एलईडी’ दिव्यांचा नयनरम्य असा रथ साकारला आहे.
मंडळातर्फे केलेले सामाजिक कामे
- रक्तदान, मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या तपासण्या आणि मोफत चष्मे वाटप
- हेल्मेट सक्ती व शहरातील रस्त्यांच्या खड्डयांविरोधात मोर्चा काढण्यात आला होता.
- भारतीय जवानांच्या वीर मातांचा सत्कार व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार
- अनाथ व गरजू मुलांना औषध वाटप, धान्य वाटप त्याचप्रमाणे शैक्षणिक मदत
- पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्न आणि धान्य वाटप
- कोरोना काळात मंडळातर्फे मोफत लसीकरण शिबिरातून १२०० नागरिकांचे मोफत लसीकरण
मंडळाचे पदाधिकारी
अध्यक्ष अशोक मोडक, कार्याध्यक्ष अविनाश वाडकर, सचिव नितीन राऊत, खजिनदार शेखर बेहेरे, उत्सवप्रमुख पुष्कर तुळजापूरकर व कार्यकारी अध्यक्ष ओंकार पाडळकर आणि कपिल राऊत.
----------------
फोटो ः 40312
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.